Samsung 5G Smartphone : शानदार फीचर्स असणारा सॅमसंगचा ‘हा’ 5G फोन 15 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार, जाणून घ्या नवीन किंमत

Ahmednagarlive24 office
Published:

Samsung 5G Smartphone : फ्लिपकार्टवर सध्या व्हॅलेंटाईन डील्स उपलब्ध आहेत. त्यामुळे या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन विकत घेऊ शकता. या ऑफरमध्ये तुम्ही Samsung Galaxy F23 हा स्मार्टफोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.

या स्मार्टफोनची मूळ किंमत 23,999 रुपये इतकी आहे. परंतु, तुम्हाला या स्मार्टफोनवर बँक ऑफर तसेच एक्सचेंज ऑफर मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही हा फोन आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. जाणून घेऊयात याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

घेता येणार एक्सचेंज ऑफरचा लाभ

कंपनीच्या या फोनवर 9,000 रुपयांची सूट मिळाली की तुमच्या स्मार्टफोनची किंमत 14,999 रुपये इतकी होईल.तर तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डसह व्यवहारांवर अतिरिक्त 1,000 रुपयांपर्यंत 10% पर्यंत सूट मिळेल. तसेच तुम्हाला या स्मार्टफोनवर 14,400 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. तुम्ही एक्सचेंज ऑफरचा पुरेपूर फायदा घेतला तर, तुमच्या या फोनची किंमत 5,00 रुपयांनी (14,999-14,400) कमी होईल. परंतु, त्यापूर्वी हे लक्षात ठेवा की या एक्सचेंज ऑफरचा फायदा तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून आहे.

जाणून घ्या स्पेसिफिकेशन

कंपनीच्या या फोनमध्ये 1080×2408 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले मिळेल तर या फोनचा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनचा प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G चिपसेटने सुसज्ज असणार आहे. स्टोरेजचा विचार केला तर, या फोनमध्ये 6GB RAM आणि 6GB व्हर्चुअल रॅमसह 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे.हा फोन Android 12 वर आधारित आहे जो One UI 4.1 वर काम करतो.

शानदार बॅटरी

या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यात 50MP चा प्राइमरी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 8MP चा अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP चा तिसरा लेन्स आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. तसेच या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या या फोनचा रंग एक्वा ब्लू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe