Maharashtra News:मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना इडीकडून काल अटक करण्यात आली. त्यानंतर आज शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा समन्स पाठवून चौकशीसाठी बोलाविले आहे.
त्यामुळे आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येत आहे.यासंबंघी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी काही सूचक ट्विटस केली आहेत. ‘एक संजय गेला आता दुसरा लवकरच जाईल’.

‘एनएसईएल घोटाळ्यातील हिमालयीन बाबा संजय पांडेच आहे का?’ ‘मला दिलेली कामगिरी फत्ते झाली’, असे कंबोज यांनी म्हटले आहे. त्यामुळे संजय पांडे यांच्यापाठोपाठ आता ईडी संजय राऊत यांनाही ताब्यात घेणार का, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या कथित घोटाळ्यात संजय राऊत यांची १ जुलै रोजीही १० तास चौकशी झाली होती. याच प्रकरणात २ फेब्रुवारी रोजी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या प्रवीण राऊत यांना अटक केली होते.
ईडीने यापूर्वीही संजय राऊत यांनी चौकशी केली होती. त्यावेळी जवळपास १० तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा ईडीने संजय राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.













