“संजय राऊत केवळ खोटे बोलतात, पुरावे देण्याचे हिंमत नाही”

Content Team
Published:

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  यांच्यावर INS विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर किरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. आज त्यांच्या चौकशीचा तिसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पाठीशी असल्याचे सांगितले आहे.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टॉयलेट घोटाळ्याचाही आरोप केला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांना पुन्हा एकदा अटकपूर्व जामिनासाठी पळापळ करावी लागणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असे टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, मला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) निर्धास्त रहा म्हणाले. सत्य तुमच्या बाजूने आहे. जेवढे तास तुमची चौकशी करायची आहे, तेवढी करू द्या, असे म्हणत त्यांनी माझ्या पाठिशी असल्याचे सोमय्यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर एक डझन आरोप लावलेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे कशाप्रकारे माफियागिरी करतात, हे आता लोकांना कळेल.

संजय राऊत केवळ खोटे बोलतात. त्यांच्यामध्ये पुरावे देण्याचे हिंमत नाही. आपण चौकशीला सामोरे जावू. आपल्या पाठिशी सत्य असल्याने कशाचीही भीती नाही असेही सोमय्या म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe