मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे महाविकास आघडीच्या नेत्यांमागे हातधुवून लागल्याचे दिसत आहे. अशातच शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील ईडीने (ED) कारवाई केली आहे. त्यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच ५७ कोटींचा घोटाळा केला असल्याचा देखील आरोप संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केला आहे.

संजय राऊत म्हणाले, INS विक्रांतच्या (INS Vikrant) जतनासाठी पैसे जमवण्यात आले. या कामात किरीट सोमय्या यांनी पुढाकार घेतला. लाखो लोकांनी पैसे दिले.
मात्र हे पैसे राजभवनात (Raj Bhavan) पोहोचलेच नाही, या पैशांचे पुढे काय झाले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणात 57 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. विक्रांतशी देशातील नागरिकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. ते देशाच्या संरक्षण शक्तीचे एक प्रतिक आहे. राजभवनात पैसे जमा न झाल्याच्या खुलाशाचे पत्र देखील आपल्याकडे असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
त्याच्यामध्ये जर घोटाळा होत असेल तर हा देशद्रोह ठरतो. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर देशद्राहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत यांनी ईडी वरही भाष्य केले आहे. ते म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा जर खरच निपक्षपाती असतील तर त्यांनी या प्रकरणाचा तपास करावा असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे.