संजय राऊत यांना ईडीचे समन्स, मंगळवारी चौकशीला बोलाविले

Published on -

Maharashtra news : शिवसेनेतील बंडाळीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बाजू जोरकसपणे लावून धरणारे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनाच आता कोंडीत पकडण्यात आले आहे.

राऊत यांना इडीने पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स पाठविले आहे. त्यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, संजय राऊत यांनी आपल्याला अद्याप ईडीची कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले आहे.

तशी नोटीस आली तरी आपण चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ वाढवून मागू, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.यापूर्वी एप्रिल महिन्यात ईडीने पत्राचाळ प्रकरणातच संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबाग येथील मालमत्ता जप्त केल्या होत्या.

यामध्ये संजय राऊत यांच्या मुंबईतील राहत्या घराचाही समावेश होता. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे.

याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्यीय मित्र प्रवीण राऊत यांनाही ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्याआधारे ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News