Sanjay Raut : संजय राऊतांना दणका ! राऊतांना अटक होणार? वॉरंट जारी

Published on -

Sanjay Raut : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट (Arrest warrant) जारी करण्यात आले आहे. भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) संजय राऊत यांना वारंवार इशारा देत होते. तसेच संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नीवर आरोप केले होते.

मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी संजय राऊत यांच्या विरोधात बदनामीची तक्रार दाखल केली होती. यानंतर शिवडी कोर्टाने (Shivdi Court) संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर संजय राऊत यांनी टॉयलेट घोटाळ्याचे आरोप केले होते. मेधा सोमय्या यांनी या प्रकरणी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात (Navghar Police Station) ही तक्रार दाखल केली होती.

भादंवि कलम 503, 506 आणि 509 अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली होती. राऊत यांच्या आरोपामुळे आपली बदनामी झाल्याचे मेधा यांनी तक्रारीत म्हंटले होते.

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात सतत आरोप सत्र सुरूच असते. सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा देखील ठोकला होता. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी शिवडीच्या कोर्टात राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.

काय आहे घोटाळा प्रकरण ?

मीरा भाईंदरमध्ये 154 सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली. यातील 16 शौचालयं बांधायचं काम किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला देण्यात आलेलं.

या प्रकरणी खोटी कागदपत्र देऊन मीरा भाईंदर पालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना आमदारांनी केला होता. प्रताप सरनाईक यांच्याकडून हा आरोप करण्यात आलेला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe