मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर नाराज असल्याची चर्चा होत होती. एकनाथ शिंदे काही शिवसेनेच्या आमदारांसह नॉट रिचेबल येत आहेत. एकनाथ शिंदे सुरतमध्ये (Surat) एक हॉटेलमध्ये आहेत.
या सर्व प्रकरणावर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया डिलिओ आहे. ते म्हणाले शिवसेनेचे अनेक नेते मुंबईत नाहीत, पण भूकंप झालेला नाही, आम्ही आता वर्षा (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी) जात आहोत.
पुढे राऊत म्हणाले की काही आमदार म्हणतात की आम्हाला का आणले, हे कळत नाही. गुजरातच्या नेत्यांनी त्यांना सुरतमध्ये ठेवले आहे. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपण महाराष्ट्राला (Maharashtra) स्थिर करू शकत नाही.
एकनाथ शिंदे यांचा बचाव करताना राऊत म्हणाले की, कालपर्यंत ते आमच्यासोबत हॉटेलमध्ये होते आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार विजयी व्हावेत यासाठी आमचा प्रयत्न होता,
जोपर्यंत आम्ही शिंदे यांच्याशी बोलणार नाही तोपर्यंत ते काहीही बोलू शकत नाहीत. शिंदे यांच्यावर नाराजी नाही, फक्त मुख्यमंत्री सर्वांची माहिती घेत असतात.
संजय राऊत म्हणाले, शरद पवार दिल्लीत आहेत, विरोधकांची बैठक आहे, आम्ही त्यांच्याशी बोललो आहोत. राजकारणात अनेकवेळा अशा वातावरणातून जावे लागते.
शिंदे यांच्यावर सरकार पाडण्याचे प्रयत्न पूर्ण होणार नाहीत, शिंदे हे निष्ठावान कार्यकर्ता असून त्यांनी आमच्यासोबत अनेकदा आंदोलने केली, ते बाळासाहेबांचे सैनिक आहेत.
अनिल परब यांना आज ईडीची नोटीस देऊन बोलावण्यात आले आहे, सरकार अस्थिर करण्याचे काम कसे सुरू झाले आहे, हे समजून घ्यावे लागेल, असे राऊत म्हणाले.
ते सर्व शिवसैनिक आहेत आणि निष्ठावंत आहेत, वाईट काळात एकत्र होते, आता चांगला काळ आहे. गुजरातमध्ये त्यांना 7 स्तरांच्या सुरक्षेखाली बंद करण्यात आले आहे. शिंदे चर्चेसाठी तयार असून त्यांच्याशी संपर्क साधला आहे असेही राऊत म्हणाले आहेत.