संजय राऊत यांचा आग लावण्याचा धंदा आहे.. आता त्यांची मजल छत्रपतींच्या घरातही..

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मीडियाशी बोलताना शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आग लावण्याचे काम करतात, व दोन घरांमध्ये भांडणे लावतात, असा आरोप केला आहे.

पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “राऊत यांचा आग लावण्याचा धंदा आहे. उद्धव आणि राज यांच्यात त्यांनीच भांडणे लावली. त्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी राऊतांची गाडीही जाळली होती.

या दोन भावांमध्ये भांडणे लावल्यानंतर आता ते छत्रपती (Chhatrapati) घराण्यातही आग लावत आहेत. दहा मिनिटे त्यांचे सुरक्षा रक्षक बाजूला काढा आणि मग मराठा समाजाने (Maratha community) त्यांचा ताबा घेतला पाहिजे,” असेही राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, अयोध्येला जाणार म्हणणाऱ्या फक्त लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे, असा टोला त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लगावला. अतिक्रमणाबाबत मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal Corporation) नोटीस मिळाली आहे. कायदेशीर उत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच “पाठित खंजीर खुपसून, देवेंद्र फडणवीसांना फसवून नगरपालिका असेल किंवा राज्यात सत्तेत लोक बसले आहेत. सेना भाजपचं सरकार सत्तेत येईल, त्याला तुम्ही मोदींचा फोटो लावा, तुमचा फोटो लावा आणि एकत्र राज्य आणू असा शब्द उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिला होता.

सत्ता आल्यानंतर शब्द न पडू देणारे मुख्यमत्री राज्यात बसलेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीनं ते मुख्यमंत्री झाले आणि अडीच वर्ष ते राज्य करतायत,” असेही नितेश राणे म्हणाले आहेत.

एका पत्रकारानं मला विचारलं अडीच वर्ष झालेत, कसं वाटतंय. एका चपट्या पायाच्या माणसाचे अडीच वर्ष झालेत, म्हणजेच महाराष्ट्राला पनवती लागून अडीच वर्षे झाली इतकंच विश्लेषण या सरकारचं करेन असे त्यांना सांगितल्याचं राणे सांगलीतील एका सभेदरम्यान म्हणाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe