किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचे संजय राऊतांकडून समर्थन; म्हणाले..

मुंबई : शिवसेना विरुद्ध भाजप (Shiv sena vs BJP) असा संघर्ष मुंबईत (Mumbai) पेटला आहे. शुक्रवारी रात्री मोहित कंबोज (Mohit Kamboj) तर शनिवारी रात्री किरीट सोमय्या (Kirit Somaiya attack) यांच्यावर शिवसैनिकांनी हल्लाबोल केला आहे.

या घटनेत सोमय्या पुन्हा जखमी झाले आहेत. त्यांच्या गाडीवर दगडफेक कऱण्यात आली असून जखमी सोमय्यांच्या हनुवटीला मार लागला आहे. त्यामुळे रक्तबंबाळ हनुवटीसह सोमय्या गाडीतच बसून राहिले होते.

या घटनेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट (Tweet) करून म्हणाले की, आयएनएस विक्रांतच्या निधीचा अपहार करणारा आरोपी बोगस जात प्रमाणपत्र वापरून निवडून आलेल्या दुसऱ्या आरोपीला भेटायला जातो.

त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र होतात. देशाशी बेइमानी करणाऱ्या चोरांवर दोन दगड पडले तर भाजपला इतके तळमळ मळमळ करण्याचे कारण काय? आयएनएस विक्रांत घोटाळा हा देशद्रोह आहे! जय महाराष्ट्र, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, खार पोलीस ठाण्यात रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांना भेटण्यासाठी आलेले किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्टेशनबाहेर काल रात्री हल्ला करण्यात आला होता.

शिवसैनिकांच्या हल्ल्यात सोमय्या यांच्या गाडीची काच फुटून त्यांना दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

व शिवसैनिकांवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते वांद्रे पोलीस स्टेशनबाहेर जमले होते. यावेळी शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe