Maharashtra News:सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचे विधेयक राज्य विधिमंडळाच्या अधिवेशानात आज पहिल्याच दिवशी बहुमताने मंजुर करण्यात आले आहे.
त्यामुळे आता यापुढे राज्यात ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांची थेट जनतेतून निवड होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये थेट जनतेतून सरपंच निवडीच्या निर्णयाला स्थगिती दिली होती, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय रद्द केला होता.
त्यावर आता शिक्कामोर्तब झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१६ मध्ये त्यांनी राज्यात सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा निर्णय रद्द केला.
पुन्हा सत्ताबदल झाल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी हा निर्णय रद्द करत सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानसभेत थेट जनतेतून सरपंचांची निवड करण्याचं विधेयक मांडले. ते बहुमताने मंजूर करण्यात आले. याशिवाय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्येही काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.