Post Office : पोस्ट ऑफिसच्या सर्व योजना या सुरक्षित आणि जास्त परतावा देणाऱ्या असल्याने अनेकजण त्यात गुंतवणुक करतात. पोस्टाच्या ऑफिसच्या खूप योजना प्रसिद्ध आहेत. त्यापैकी ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा आहे.
या योजनेत तुम्ही रोज केवळ 95 रुपये वाचवले तर तुम्हाला तब्बल 14 लाख रुपये मिळू शकता. म्हणजेच जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्ही काही वर्षात लखपती व्हाल.

ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा
पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना आहे. जर तुम्हाला ही योजना सुरु करायची असेल तर तुमचे वय 19 ते 45 वर्षे वयोगटातील असावे. या वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करू शकतो. योजनेत 15 किंवा 20 वर्षांचे दोन मॅच्युरिटी कालावधी उपलब्ध आहेत.
गुंतवणूकदारांना त्यांच्या गरजेनुसार परिपक्वता कालावधी निवडता येतो. या योजनेत, गुंतवणूकदाराला 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. योजनेंतर्गत गुंतवणूकदाराला, 15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीवर विमा रकमेच्या 20-20 टक्के रक्कम 6,9 आणि 12 वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतात.
गुंतवणूकदाराला 20 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधी अंतर्गत, 8, 12, 16 वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतात.त्याशिवाय 40% रक्कम परिपक्वतेच्या वेळी बोनससह देण्यात येते.
समजा तुमचे वय 25 वर्ष आहे. जर तुम्ही या योजनेत 20 वर्षांसाठी सात लाख रुपयांच्या विमा रकमेसह पॉलिसी घेतली तर महिन्याला तुम्हाला 2850 रुपये प्रीमियम भरावा लागेल (दररोज 95 रुपये बचत). म्हणजे 6 महिन्यांत तुमची रक्कम 17,100 रुपये इतकी होईल. मॅच्युरिटीच्या वेळी, तुमच्याकडे एकूण 14 लाख रुपयांचा निधी जमा केला जाईल.