FD returns : महागाईत दिलासा! ‘ही’ बँक देत आहे एफडीवर 7.50% पर्यंत व्याजदर, आजच करा गुंतवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD returns : काही बँकांनी ज्येष्ठ नागरिकांना खूप मोठा दिलासा दिला आहे. याचे कारण म्हणजे मुदत ठेवींवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज या बँका देत आहे. आता HSBC या बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केलीय.

त्यामुळे महागाईने हैराण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची ही सुवर्णसंधी आहे. हे नवीन दर 19 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत. एकूण व्याजदराचे गणित सविस्तर जाणून घेऊयात.

कालावधीनुसार मिळते व्याज

ग्राहकांना आता 7 ते 8 दिवसांच्या एफडीवर 2.85% व्याज मिळणार आहे. तसेच 9 ते 29 दिवसांच्या एफडीवर 3% दराने व्याज, 30 ते 59 दिवसांच्या एफडीवर 3.40% आणि 60 ते 89 दिवसांच्या एफडीवर 3.60% व्याजदर मिळणार आहे.

त्याचबरोबर 90 ते 94 दिवसांच्या एफडीवर 3.80 टक्के, 95 ते 179 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के व्याज,80 दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के व्याज आणि 181 ते 269 दिवसांच्या एफडीवर 3.25 टक्के व्याजदर आहे.

त्याशिवाय हेही लक्षात घ्या की 270 ते 399 दिवसांच्या एफडीवर 3.10% व्याज, 400 दिवसांच्या एफडीवर 3.25% व्याज, 401 दिवस ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर आता 6.25% व्याज मिळणार आहे.

तर 599 दिवस ते 18 महिन्यांच्या एफडीवर 3.30% व्याज, 600 दिवसांच्या एफडीवर 3.75 टक्के व्याज ,601 ते 699 दिवसांच्या एफडीवर 3.30 टक्के व्याज मिळणार आहे. त्याचबरोबर 700 दिवसांच्या एफडीवर 3.75% व्याज आणि तर 701 ते 731 दिवसांच्या एफडीवर ग्राहकांना 3.50% दराने व्याज मिळणार आहे.

तेव्हा मिळेल 7.50 टक्के व्याज

ग्राहकांनी हेही ध्यानात ठेवावे की 732 दिवसांपासून ते 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.50% व्याज, 36 महिने ते 37 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.00% व्याजदर सध्या मिळत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यावर 7.50% व्याज मिळणार आहे.

ही बँक 37 ते 60 महिन्यांच्या मुदतीच्या FD वर 6.00 टक्के व्याजदर देत असून तुम्हीही आता या बँकेत 10,000 रुपयांपर्यंत FD सुरू करू शकता. तुम्हाला नियमित दरापेक्षा 0.50% अधिक व्याज दिले जाईल. तर मुदतपूर्व ठेवी काढले तर कोणतेही व्याज दिले जात नाही