अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१९- २० मध्ये झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या अहमदनगर
येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील पदवीयुत्तर पदवीच्या वर्गातील तीन विद्यार्थिनी विद्यापीठाच्या एकूण गुणवत्ता यादीत व विषयाच्या गुणवत्ता यादीत आल्या असल्याची माहिती प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी दिली.

पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील एकूण महाविद्यालयातून ही गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येते. एम. कॉम वर्गातील कु. खेत्री अर्चना अर्जुन व कु. कदम भारती संजय यांनी अनुक्रमे सहावा व नववा क्रमांक पटकावला आहे.
असून विषयनिहाय गुणवत्ता यादीत ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टीम या विषयांमध्ये कु. खेत्री अर्चना अर्जुन हिने तृतीय क्रमांक तर कु. कत्रापवार काजल मुकेश हिने सातवा क्रमांक पटकावला आहे .
महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या या उत्तुंग यशाबद्दल सदर विद्यार्थिनींचे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. आमदार आशुतोषदादा काळे, प्राचार्य डॉ. माधव सरोदे , उपप्राचार्य प्रा. नासिर सय्यद, उपप्राचार्य रामदास बर्वे,
वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. शुभांगी ठुबे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा .डॉ. इजाज शेख, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर सेवकांनी हार्दिक अभिनंदन केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम