SBI Bank : जर तुम्ही SBI अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक आपल्या ग्राहकांसाठी सतत नवीनतम सुविधा घेऊन येत असते. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. या बँकेचे नवीनतम FD दर जाहीर झाले आहेत.
बँक एफडीमध्ये गुंतवणूक करणे हा सर्वात सुरक्षित पर्याय असून स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI, ज्याची भारतातील प्रमुख बँकांमध्ये गणना करतात, नवीन वर्षाच्या सुरुवातीपूर्वीच त्यांच्या FD दरांमध्ये मोठा बदल देखील करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांसाठी SBI ने त्यांच्या FD दरांमध्ये केलेल्या बदलांची संपूर्ण यादी जारी केली आहे.
या बँकेने 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर सामान्य लोकांसाठी 3 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.5 टक्के एफडी दर निश्चित केला असून 46 दिवस ते 179 दिवसांच्या कालावधीतील सर्वसामान्यांसाठी एफडी दर 4.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच एफडी दर 5 टक्के केला आहे.
1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी FD व्याजदर
स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या यादीनुसार, 180 दिवस ते 210 दिवसांच्या दरम्यान करण्यात आलेल्या एफडीवर सर्वसामान्यांसाठी 5.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.75 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. तसेच जे 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीची निवड करतात.
त्यांच्यासाठी सामान्य लोकांसाठी 5.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के व्याजदर असणार आहे. 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवरील व्याजदर सामान्य लोकांसाठी 6.8 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.3 टक्के असून 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी, बँक सामान्य लोकांसाठी 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.5 टक्के व्याजदर देण्यात येत आहे.
इतकेच नाही तर, बँक 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व झालेल्या ठेवींवर सर्वसामान्यांसाठी 6.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 टक्के व्याजदर मिळेल. शिवाय 5 वर्षे ते 10 वर्षांपर्यंतच्या दीर्घ मुदतीच्या ठेवींवर, बँक सामान्य लोकांसाठी 6.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.5 टक्के व्याजदर देखील मिळेल.