SBI Bank News : 40 कोटींहून अधिक ग्राहकांना एसबीआयने दिला झटका ! घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; आता ..

Published on -

SBI Bank News : तुम्ही देखील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. बँकेने एक मोठा निर्णय घेत तब्बल ४० कोटींहून अधिक ग्राहकांना जोरदार धक्का दिला आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो एसबीआयने MCLR दरात 25 बेस पॉइंट्स किंवा 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे आता एसबीआयचे कर्ज महाग होणार आहे आणि EMI देखील वाढणार आहे. एसबीआयने हा निर्णय आरबीआयने रेपो रेटमध्ये केलेल्या वाढीनंतर घेतला आहे. काही दिवसापूर्वी आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती आणि रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉईंटची वाढ केली होती आता रेपो रेट 6.25% झाला आहे.

बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर 15 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. या दिवसापासून MCLR आधारित कर्जाचा व्याजदर वाढणार आहे. तसेच ज्या ग्राहकांचे कर्ज सुरू आहे त्यांना ईएमआयसाठी त्यांचे खिसे अधिक मोकळे करावे लागतील. एसबीआयचे 40 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. SBI च्या या निर्णयाचा फटका नवीन आणि जुने दोन्ही ग्राहकांना बसणार आहे.

एसबीआयच्या वेबसाइटनुसार, एक महिना आणि तीन महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR 7.75% वरून 8.00% करण्यात आला आहे. सहा महिने आणि एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR 8.05% वरून 8.30% करण्यात आला आहे. दोन वर्षांसाठी MCLR 8.25% वरून 8.50% करण्यात आला आहे, तर तीन वर्षांसाठी MCLR 8.35% वरून 8.60% करण्यात आला आहे.

हे पण वाचा :- Electric Vehicle : भारीच .. ‘इतक्या’ स्वस्तात टू-व्हीलरला द्या ईव्हीच रूप ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News