SBI released latest rate of FD : सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे, या हंगामात लोकं गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या योजना शोधत असतात. या काळात लोकं बँकाच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. अशातच बँकांच्या FD व्याजदरातील नवीन बदलांबद्दल माहिती ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान, सर्वसामान्यांना सुविधा देण्यासाठी देशातील बँका वेळोवेळी त्यांचे एफडी दर बदलत असतात, त्याचप्रमाणे एसबीआयने देखील नवीन एफडी दर जारी केले आहेत.
बँक एफडीमध्ये गुंतवणूक करणे हा आजचा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. त्याचप्रमाणे, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI, ज्याची भारतातील प्रमुख बँकांमध्ये गणना केली जाते, नवीन वर्षाच्या सुरुवातीपूर्वीच त्यांच्या FD दरांमध्ये मोठा बदल केला आहे. SBI ने त्यांच्या FD दरांमध्ये केलेल्या बदलांची संपूर्ण यादी जारी केली आहे. जारी केलेल्या यादीनुसार, SBI ने 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर सामान्य लोकांसाठी 3 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.5 टक्के एफडी दर निश्चित केला आहे. यासोबतच 46 दिवसांपासून ते 179 दिवसांच्या कालावधीतील सर्वसामान्यांसाठी एफडी दर 4.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच एफडी दर 5 टक्के करण्यात आला आहे.

1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.75 टक्के व्याजदर
स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या यादीनुसार, 180 दिवस ते 210 दिवसांच्या दरम्यान केलेल्या एफडीवर सर्वसामान्यांसाठी 5.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.75 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. त्याच वेळी, जे 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीची निवड करतात, त्यांच्यासाठी सामान्य लोकांसाठी 5.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के व्याजदर असेल.
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवरील व्याजदर सामान्य लोकांसाठी 6.8 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.3 टक्के आहेत. 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी, बँक सामान्य लोकांसाठी 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.5 टक्के व्याजदर देत आहे. तसेच, बँक 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व झालेल्या ठेवींवर सर्वसामान्यांसाठी 6.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 टक्के व्याजदर देईल. त्याच वेळी, 5 वर्षे ते 10 वर्षांपर्यंतच्या दीर्घ मुदतीच्या ठेवींवर, बँक सामान्य लोकांसाठी 6.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.5 टक्के व्याजदर देते.