SBI FD Rate Hike : आताच्या काळात अनेकजण मुलांच्या किंवा स्वतःच्या भविष्यासाठी स्वतःजवळ असलेले पैसे कुठे ना कुठेतरी गुंतवणूक (Investment) करून ठेवत असतात. जर तुम्ही SBI बँकेमध्ये (SBI Bank) पैसे गुंतवणूक करून ठेवले असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी खातेधारकांना बँक मोठी भेट देणार आहे.
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने दिवाळीपूर्वी आपल्या करोडो खातेदारांना एक मोठी भेट दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ने मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या FD योजनांवर (SBI FD rates Hike) वाढवण्यात आले आहेत. याचा अर्थ नवीन दर शनिवारपासून म्हणजेच १५ ऑक्टोबर २०२२ पासून लागू झाले आहेत.
आपल्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती देताना SBI ने सांगितले की, FD च्या दरात 20 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. आता बँका सामान्य नागरिकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेव योजनांवर 3 ते 5.85 टक्के व्याजदर देत आहेत. दुसरीकडे, SBI ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 6.65 टक्के व्याजदर देत आहे.
सामान्य लोकांसाठी एफडी दर
7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वरील व्याजदर 2.90 टक्क्यांवरून 3 टक्के करण्यात आला आहे.
46 दिवस ते 179 दिवसांच्या कालावधीसाठी ते 3.90 टक्क्यांवरून 4 टक्क्यांपर्यंत वाढले.
180 ते 210 दिवसांच्या कालावधीसाठी ते 4.55 टक्क्यांवरून 4.65 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
211 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 4.60 टक्के ते 4.70 टक्के.
एक ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी, 5.45 टक्क्यांवरून 5.60 टक्क्यांपर्यंत वाढले.
दोन ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी 5.50 टक्के ते 5.65 टक्के.
तीन ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी, 5.60 टक्क्यांवरून 5.80 टक्क्यांपर्यंत वाढले.
पाच वर्षे ते 10 वर्षे कालावधीसाठी एफडी 5.65 टक्के ते 5.85 टक्के.
ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी व्याजदर
यासोबतच SBI ने सिनियर सिटीझन FD वरील व्याजदरात 10 ते 20 bps ने वाढ केली आहे. २ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर ही वाढ करण्यात आली आहे. सात दिवस ते ४५ दिवसांच्या कालावधीसाठी ३.४ टक्क्यांऐवजी ३.५ टक्के व्याज मिळणार आहे. पाच वर्षे ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी ती 6.45 वरून 6.65 टक्के करण्यात आली आहे.