SBI : SBI च्या ग्राहकांसाठी (SBI customer) ही बातमी महत्त्वाची आहे. कारण या बँकेने (SBI Bank) आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट (Alert for customers) जारी केला आहे.
एक व्हायरस खातेदारांची (SBI account holders) खाते रिकामे करत आहे. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार (Online transactions) करत असताना काळजी घ्यावी.

अशा प्रकारे तुमचे बँक खाते हॅक होऊ शकते
तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात फसवणुकीच्या पद्धतीही बदलल्या आहेत. आज अनेक लोक नवनवीन युक्त्या अवलंबुन मोठ्या चोरी करत आहेत. सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातूनही बँक वापरकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे.
अगदी अलीकडेच, स्टेट बँक ऑफ इंडियाने SOVA व्हायरसबाबत अलर्ट जारी केला आहे. हा व्हायरस इंटरनेटच्या वापराने तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होतो आणि अनेक प्रयत्नांनंतरही तो अनइन्स्टॉल होत नाही. अलीकडे, 200 हून अधिक वापरकर्ते या प्रकारच्या हल्ल्याला बळी पडले आहेत.
वापरकर्ते या घोटाळ्यात कसे अडकतात?
माहितीनुसार, सप्टेंबर 2021 मध्ये या व्हायरसचे नाव पहिल्यांदा समोर आले होते. जेव्हा वापरकर्ता त्याचा लॉगिन आयडी वापरतो तेव्हा हा व्हायरस फिशिंगच्या वेळी त्याचा डेटा चोरतो.
हा घोटाळा करण्यासाठी गुन्हेगार एसएमएसद्वारे फिशिंग लिंक वापरतात. वापरकर्त्यांनी या एसएमएस लिंकवर क्लिक करताच त्यांच्या बँक खात्याचे तपशील चोरले जातात.