अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियानं गृह कर्जावरील व्याज दरात कपात केली आहे.
अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत होम लोन म्हणजेच गृहकर्जाचं व्याज कमी करण्याचा निर्णय स्टेट बँकेने घेतला आहे.
यामुळे आता गृहकर्ज घेणे सोईस्कर होणार आहे.. जाणून घ्या नवीन दर 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज दर 6.70% पासून सुरू होतील.
30 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंतच्या होम लोनवरील व्याज दर 6.95 टक्क्यांपासून सुरू होत असल्याचे बँकेने म्हटले आहे.
याशिवाय 75 लाख रुपयांपेक्षा जास्त लोनवर बँक 7.05 टक्के व्याज देणार आहे. महिलांना अधिक फायदा होईल महिलांना 5 बीपीएस सवलत मिळेल.
महिला कर्जदारांना 5 बेसिस पॉईंट (0.05 टक्के) ची विशेष सवलत दिली जात असल्याचे बँकेने म्हटले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|