पुण्यातील शाळा महाविद्यालये इतके दिवस बंद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाबाधित रूग्णसंख्येमुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत यापूर्वी पुणे जिल्ह्यात देण्यात आलेले आदेश १४ मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.

याच अनुषंगाने शाळा, महाविदयालये, सर्व खासगी क्लासेस व इतर शाळा देखील १४ पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने दि.२८ फेब्रुवारी पर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी शाळा,

महाविद्यालये, सर्व खाजगी क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत. परंतु, प्रत्येक दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा,

महाविदयालये, सर्व खासगी क्लासेस व इतर शाळा १४ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.  मात्र ऑनलाईन पद्धतीने शाळा, महाविद्यालये, स

र्व खासगी क्लासेस व इतर शाळा सुरु राहतील तसेच पुणे जिल्ह्यात १० वी व १२वीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी,

गट शिक्षण अधिकारी यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. सेही नमूद केले आहे. नियोजित परिक्षा आवश्यक असल्यास शक्यतो ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्यात, असेही आदेशात म्हटले आहे.

सदर आदेशाचा भंग करणाऱ्याविरूध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग कायदा, व  इतर नियमान्वये कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News