राज्यातील पहिली ते चौथीच्या शाळा ‘या’ दिवशीपासून होणार सुरू

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :-  कोरोनामुळे प्रदीर्घ काळापासून शाळेचे नियोजन कोलमडले आहे. तसेच शाळा कधी व कशा सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने अखेर हळूहळू राज्यातील शाळा सुरु करण्याकडे सरकारने सकारात्मक पाऊले टाकली आहे.

यातच महत्वाची माहिती समोर आली असून येत्या राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून 11 नोव्हेंबरपासून राज्यातील पहिली ते चौथीच्या प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत.

यामुळे आता सर्वच शाळा सुरु होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासंदर्भात प्राथमिक शाळांच्या स्वच्छता करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत.

गेली दीड वर्षे शाळा बंद असल्याने मुलांच्या शैक्षणिक स्तरावर विपरीत परिणाम होत असून ऑफलाइन शिक्षण देण्यात अडचणी असल्याने आणि राज्यातील पाच जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे.

राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा, नगर जिल्हा अजूनही कोरोनाच्या प्रादुर्भावाखाली आहेत. मात्र अन्य जिल्ह्यातील कोरोनाची लाट आता बऱ्यापैकी ओसरली आहे.

अशा परिस्थितीत मुलांचे नुकसान होऊ नये याकरिता राज्य शासनाने माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय अगोदर घेतला.

या शाळांमधील एकूण कामकाज लक्षात घेऊन सरकारने आता 11 नोव्हेंबर रोजी चा मुहूर्त प्राथमिक शाळांसाठी जाहीर केला आहे. अर्थात या संदर्भातील शासन नियमावली जाहीर झालेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!