SCSS : अनेकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. काही अशा योजना आहे ज्यात सर्वात जास्त मिळते शिवाय त्यात कर लाभही दिला जातो. जर तुम्हीही अशाच योजनेच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
पोस्ट ऑफिसची SCSS ही अशीच एक योजना आहे. ज्यात गुंतवणूकदारांना बँक एफडीपेक्षा जास्त व्याज मिळते आणि यात कर लाभ मिळतो. त्यामुळे अनेकजण पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत. जाणून घ्या सविस्तर.
खरंतर गुंतवणूक आणि बचतीच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा सर्वात उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिस लोकांसाठी वेगळ्या प्रकारची बचत योजना देत असते. या सर्व योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला या योजनेमध्ये खूप चांगले व्याज मिळते. तसेच यात तुम्हाला कर लाभही मिळतो.
निवृत्तीनंतर चालू करा खाते
पोस्ट ऑफिसच्या SCSS या योजनेअंतर्गत, 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणारी कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिस योजनेमध्ये खाते चालू करू शकते. तसेच, जर एखाद्या व्यक्तीचे वय 55 वर्षे असल्यास तो निवृत्तीनंतर पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो.
मिळते बँकेपेक्षा जास्त व्याज
पोस्ट ऑफिस सीनियर सेव्हिंग स्कीममध्ये तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवणूक करता येते. पोस्ट ऑफिसची ही योजना सध्या अनेक बँकांच्या एफडीपेक्षा जास्त व्याज देत असून हे लक्षात घ्या की सध्या पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 8.2 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. त्यानुसार मुदतपूर्तीनंतर परतावा देण्यात येतो. आनंदाची बाब म्हणजे SCSS वर उपलब्ध व्याज दर प्रत्येक पोस्ट ऑफिस स्कीममध्ये उपलब्ध असणाऱ्या व्याजदराच्या तुलनेत खूप जास्त आहे.
मिळेल कर लाभ
पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर या पोस्ट ऑफिसमधील ठेवीदारांना कर कपातीचा लाभ दिला जातो. या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये, ठेवीदारांना आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर लाभ मिळतो, त्यामुळे अनेकांच्या पसंतीस ही योजना उतरत आहे.