Secure Your Email Address : सध्या सहज जीमेल अकाउंट हॅक होत आहे. त्यामुळे स्मार्टफोन, लॅपटॉप्स आणि सोशल मीडियावर जीमेल अकाउंटने लॉग इन असल्याने अडचणी निर्माण होतात. कारण आता हॅकर्स तुमचे जीमेल अकाउंट सहज हॅक करून तुमचा महत्त्वाचा डेटा चोरी करू शकतात.
त्यामुळे तुमचे जीमेल अकाउंट सुरक्षित करणे खूप गरजेचे आहे. अशातच आता तुम्ही सहज आणि सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमचे जीमेल अकाउंट हॅक झाले आहे की नाही, हे लगेच तपासू शकता.काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे जीमेल अकाउंट हॅक होण्यापासून वाचवू शकता.

काय आहेत समस्या ?
- अनेकांचे जीमेल हॅक झाल्या नंतर त्यांची इतर सर्व खातीही हॅक होऊन अनेक बेकायदेशीर कामे केली जात आहेत असे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या तुमच्या Gmail ची सुरक्षा अबाधित ठेवणे खूप गरजेचे झाले आहे आणि जर तुमचा Gmail हॅक झाले असेल तर अशा काही टिप्स आहेत, ज्याचे अनुसरण करून तुम्ही तुमचे Gmail हॅक झाले आहे की नाही हे सहज जाणून घेऊ शकता.
- तुमचे Gmail खाते किती उपकरणांवर उघडले आहे हे जाणून घ्यायचे असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला gmail-login करावे लागणार आहे. यानंतर, तुम्हाला Google खात्याच्या नेव्हिगेशन पॅनलवर जावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला सुरक्षा पर्याय निवडावा लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला Manage Device चा पर्याय समोर दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे खाते कोठे आणि कोठे लॉग इन केले आहे हे लगेच तुम्हाला समजू शकते.
- तुमच्या माहितीत नसलेले असे कोणतेही उपकरण जर तुम्हाला येथे दिसले तर, तेथून लगेचच तुमचा Gmail लॉगआउट करा आणि त्याची सुरक्षा वैशिष्ट्ये मजबूत करण्यासाठी तुमचा पासवर्डही लगेच बदलून टाका. हे केल्यानंतर, तुमची वैयक्तिक माहिती कुठेही लिंक होणार नाही. इतकेच नाही तर हे देखील लक्षात ठेवा की, चुकूनही तुमचा Gmail पासवर्ड इतर कोणाशीही शेअर करू नका.