मालकाने पगार थकविला म्हणून संतापलेल्या नौकराने भर रस्त्यात काय केले पहा….

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :-  मालकाने पगार दिला नाही म्हणून कामगाराने मालकाची दुचाकी पळवून आणली. ती भर दिवसा भररस्त्यात पेटवून दिली.

अंकित शिशुपाल यादव (वय 27, सध्या रा. पिंपळे गुरव. मुळ रा. उत्तर प्रदेश) असं आरोपी कामगाराचे नाव आहे. तर, गणेश उंद्रे पाटील असे मालकाचे नाव आहे.

दरम्यान ही घटना आज (रविवारी, दि. 3) चिंचवड येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंकित हा गणेश पाटील यांच्या सिमेंटच्या फॅक्टरीमध्ये काम करतो.

त्यांची पिंपळे गुरव येथे फॅक्टरी असून गेल्या काही महिन्याचा पगार थकला होता. अनेक वेळा सांगून ही मालक गणेश हे त्याचा पगार देत नसल्याचे अंकितचे म्हणने आहे.

म्हणून मालकाने कामानिमित्त दिलेली दुचाकी आज चिंचवड येथे भर रस्त्यात पेटवून दिल्याचे त्याने सांगितले आहे.

घटनेनंतर मद्यपान केलेल्या अंकितला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनेचा अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.