अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- सांगूनही ऐकत नसल्याने तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरोधात राहाता शहरात करवाईच बडगा उगारण्यात आला आहे.
राहता शहरातील चितळीरोड वरील भाजीपाला आणि फळे विक्रेत्यांची् धरपकड करून त्यांचे वजनकाटे जप्त करण्यात आले.
राहाता तालुक्यात लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने रोजगार नसल्याने अनेक जण भाजीपाला विक्री करत आहेत.
कारवाई मुळे भाजी विक्रेत्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. यात अनेक शेतकरी देखील शेतमालाची हात विक्री करता.
कारवाईच्या भितीने रोजच धावपळ आणि आता दंडात्मक कारवाईमुळे आता जगायच कस असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
भाजीपाला, फळे आणि दूध खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असल्याने एकीकडे नगरपालिका कारवाई करत आहे तर आता पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने व्यवसायिक धास्तावले आहेत.
वेळेत भाजीपाला व फळे हा माल विकला गेला नाही तर तो खराब होत असल्याने आर्थक नुकसान देखील होत आहे. दरम्यान नगरपालिकेने आज पुन्हा एकदा फळभाजी विक्रेत्यांच्या करोना तपासण्या केल्या.
दिवसभरात 88 रँपीड टेस्ट तर 20 आरटीपीसीआर चाचण्या केल्या यात 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम