दत्त जयंती निमित्त भक्तांना पाठवा या खास मराठमोळ्या शुभेच्छा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या.(Datta Jayanti)

त्यामुळे देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला.

त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस ‘दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात. आज असलेल्या दत्त जयंती निमित्त तुमच्या परिवारामध्ये नातेवाईकांना,

मित्रमंडळींना, अप्तेष्टांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा सोशल मीडियाद्वारे द्या. काही शुभेच्छा मेसेज आम्ही तुम्हाला देणार आहोत जे तुम्ही सहज शेअर करू शकता.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!!

॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा । कृपा करा दयाघना या जीवावर कृपा करा ॥ दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥ प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥ मी तू पणाची झाली बोलवण । एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!