Fixed Deposit Interest Rate : सध्याच्या गुंतवणूक पर्यायांपैकी बँक एफडी हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. शिवाय, सध्या एफडीवर मजबूत व्याज देखील मिळत आहे. आणि जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर हा फायदा आणखी वाढतो, कारण बँका जेष्ठ नागरिकंना अतिरिक्त व्याजचा लाभ देतात.
आज आपण अशाच बँकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सध्या ज्येष्ठ नागरिकांना FD वर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहेत. या एफडीची चांगली गोष्ट म्हणजे त्यांना जास्त लॉक-इन कालावधी नसतो. ज्यामुळे तुमचे पैसे जास्त काळ अडकून राहत नाहीत. चला एक एक करून या बँकांबद्दल जाणून घेऊया…
DCB बँक
सध्या DCB बँक जेष्ठ नागरिकांना उत्तम परतावा देत आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि DCB बँकेत 26 महिने ते 37 महिन्यांत मुदतपूर्ती FD केली असेल तर तुम्हाला 8.1 टक्के दराने व्याज मिळेल.
RBL बँक
RBL बँकेत FD करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सध्या जास्त व्याज दिले जात आहेत. तथापि, त्यांना जास्त परताव्यासाठी 24 महिने ते 36 महिन्यांच्या दरम्यान परिपक्व होणाऱ्या एफडीत गुंतवणूक करावी लागेल. बँक तुम्हाला यावर तुम्हाला 8 टक्के व्याज देत आहे.
बंधन बँक
बंधन बँक देखील उत्तम व्याजदर देत आहे. ही बँक 3 ते 5 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 7.75 टक्के व्याज देत आहे. अशातच तुम्ही कमी कालावधीत जबरदस्त परतावा देत आहे.
ॲक्सिस बँक
जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि ॲक्सिस बँकेत एफडी करण्याचा विचार असेल तर तुम्हाला ही सध्या उत्तम परतावा देत आहे. बँक सध्या 7.6 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. हा व्याजदर 3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवर उपलब्ध आहे.
बँक ऑफ बडोदा
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा तुम्हाला 2 ते 3 वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही येथेही एफडी करून चांगला परतावा मिळवू शकता.