Sevgaon Politics : शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात यंदा बहुरंगी लढत झाली. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे महाविकास आघाडी कडून प्रतापराव ढाकणे आणि अपक्ष म्हणून चंद्रशेखर घुले अन काकडे यांच्यात लढत झाली. या लढतीत पहिल्यापासूनच राजळे यांचा बोलबाला राहिला.
ते सहजच जिंकतील असे अनेकजण म्हणतं होते. यानुसार, मोनिका राजळे यांनी १९ हजार ४३ हजारांचे मताधिक्य घेत पुन्हा एकदा गुलाल उधळला आहे. पण घुले यांना सुरवातीला आघाडी मिळाली होती. जवळपास 12 व्या फेरीपर्यंत आघाडीवर राहिलेत.
मात्र 13 वी फेरी सुरु झाली अन राजळे आघाडीवर गेलेत अन शेवटी विजयी झालेत. ते सलग तिसऱ्यांदा शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले असून त्यांनी आपल्या विजयाची हॅट्ट्रिक केलीये. राजळे यांना एकूण ९९ हजार ७७५ मते मिळालीत.
तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. प्रताप ढाकणे हे ८० हजार ७३२ मते आणि अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांना ५७ हजार ९८८ एवढे मते मिळालीत. गेल्या 50 वर्षांच्या काळात या मतदारसंघांमध्ये तिसऱ्यांदा निवडून येण्याचा बहुमान हा मोनिका राजळे यांना मिळाला आहे.
येथून गेल्या पाच दशकांच्या काळात कोणत्याच आमदाराला असे करता आले नाही. यामुळे मोनिकाताईंचा हा विजय अधिक स्पेशल आहे. यामुळे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या या निकालाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा पाहायला मिळाली.
मोनिकाताई यांच्या विजयात भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट अजित पवार गट यांनी मोलाची भूमिका निभावली आहे. पण आज आपण मोनिकाताईंचा विजय कोणकोणत्या कारणांमुळे झाला हे पाहणार आहोत.
राजळे यांच्या विजयाची कारणे
आमदार मोनिका राजळे हे फारच संयमी नेतृत्व आहेत. ते द्वेषाचे राजकारण करत नाहीत.
शेवगाव पाथर्डी मतदार संघात काल मोठा इतिहास घडला. पहिल्यांदाच एका आमदाराने येथे विजयाची हॅट्रिक केली. कारण की, या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.
या निवडणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात वोट कास्ट केले, दरम्यान हाच वाढलेला मतदानाचा टक्का राजळे यांच्यासाठी फायद्याचा राहिला.
मविआचे प्रताप ढाकणे आणि अपक्ष चंद्रशेखर घुले यांच्यात झालेली मतविभागणी ही त्यांच्यासाठी फायद्याची ठरली.
राजळेंनी गावोगावी तयार केलेली कार्यकर्त्यांची फळी ही या निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसली.