शाहरुख खानच्या ‘पठान’ ला मुहूर्त सापडेना; ‘या’ कारणाने पुन्हा शूटिंगला ब्रेक

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाचे शूटिंग बऱ्याच दिवसांपासून रखडलेले आहे. जानेवारीमध्ये पठाणचे शूटिंग पुन्हा चालू होणार होते. परंतु त्याआधीच शूटिंगला ब्रेक लागला आहे.

शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाचे ऑक्टोबर मधील शूटिंग हे स्पेन या देशात होणार होते. त्या ठिकाणी चित्रपटातील दोन गाणी व काही ॲक्शन सीन्सचे शूटिंग होणार होते.

परंतु आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणामुळे शूटिंग पुढे ढकलण्यात आले होते. शाहरूखच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींमुळे पठानचे शूटिंग हे जानेवारीमध्ये होणार होते.

परंतु स्पेन मध्ये सर्वाधिक कोविड रुग्ण असल्यामुळे पठानचे शूटिंग थांबवलं आहे. त्यामुळे शाहरुखच्या पठाणची वाट पाहत असलेल्या चाहत्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

आर्यन खानला अटक झाल्यानंतर शाहरूख पठानचे शूटिंग थांबवून आर्यनला जामीन मिळावा, यासाठी प्रयत्‍न करत होता. परंतु त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत होता.

बरेच दिवसानंतर आर्यनचा जामीन मंजूर झाल्यानंतर शाहरुखला दिलासा मिळाला होता. त्यानंतर पुन्हा पठाणच्या शुटिंगवर येण्यासाठी शाहरुख तयार असताना शूटिंगला पुन्हा ब्रेक लागला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe