शहाजी बापू पाटील दुर्घटनेतून थोडक्यात बचावले; नेमकं काय घडलं??

Ahmednagarlive24 office
Updated:

मुंबई : शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली आणि राज्यात नवे सरकार स्थापन झाले. बंडखोरीनंतर एका डायलॉगने फेमस झालेले बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील हे दुर्घनेतून थोडक्यात बाचवले आहेत. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील शहाजी बापू पाटील यांच्या रूमच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे.

आकाशवाणी आमदार निवासातील शहाजीबापू पाटीलांची रूम आहे. या रूमच्या छाताचा काही भाग कोसळला. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती आहे. शहाजीबापू पाटील हे घटना घडली तेव्हा आपल्या रूममध्येच होते. पण थोडक्यात बचावले. रूममधील बेडवर सिलिंगचा मोठा भाग पडल्याचे दिसून आले.

दरम्यान, शहाजीबापू पाटील हे या दुर्घटनेतून बचावले आहेत. या घटनेनंतर शहाजीबापू पाटलांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र ते सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe