Shahrukh Khan : बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार शाहरुख खानला (Shahrukh Khan) सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. 2017 मध्ये ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वडोदरा रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याला फौजदारी खटला मानण्यास नकार दिला आहे. ही बातमी समोर येताच शाहरुखचे चाहते आनंदी झाले आहेत.
वडोदरा स्टेशन चेंगराचेंगरी प्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला
न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने शाहरुख खानविरोधातील तक्रारदाराच्या याचिकेवर सुनावणी करताना ती फेटाळून लावली. यावर्षी जानेवारी 2022 मध्ये गुजरात हायकोर्टाने अभिनेत्यावर वडोदरा रेल्वे स्टेशनवर गोंधळ घालण्याचा आणि शांतता भंग केल्याचा आरोप केला होता.
जाणून घ्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण
हे संपूर्ण प्रकरण जानेवारी 2017 चे आहे. यादरम्यान शाहरुखने आपल्या ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबई ते दिल्लीसाठी ट्रेन बुक केली होती, मात्र दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच वडोदरात अभिनेत्याच्या चाहत्यांच्या जमावाने स्टेशनवर एकच गोंधळ घातला.
दरम्यान, शाहरुखने काही टी-शर्ट आणि स्मायली बॉल लोकांच्या दिशेने फेकले, ज्यामुळे जमाव गोळा करण्यासाठी तुटून पडला. या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यानंतर शाहरुखविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चित्रपटांमध्ये शाहरुख दिसणार आहे
शाहरुख खानच्या वर्कबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याचे अनेक चित्रपट रांगेत आहेत. तो लवकरच ‘पठाण’, ‘जवान’, ‘डंकी’ आणि ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे. त्याला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.