Sharad Pawar : ब्रेकिंग! राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत सरकारमध्ये जाणार, शरद पवारांचा मोठा निर्णय…

Ahmednagarlive24 office
Published:

Sharad Pawar : नुकत्याच नागालँडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा विचार करत असलेल्या शरद पवार यांनी मात्र नागालँडमध्ये मात्र भाजपसोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. याठिकाणी या राज्यात सरकारच्या स्थिरतेला कुठलाही धोका नाही. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेत जाण्याचा आग्रह धरला. यावर नागालँडचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत स्थानिक नेत्यांच्या मागणीवर चर्चा करण्यात आली.

तसेच त्यानंतर बैठकीत नागालँड सरकारला पाठिंबा देणार असल्यावर शिक्कामोर्तंब करण्यात आले. यामुळे आता देशात विरोधी पक्षांचे ऐक्य व्हावं यासाठी सातत्याने शरद पवार पुढाकार घेत आहेत. तर दुसरीकडे नागालँडमध्ये राष्ट्रवादीने घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दरम्यान याठिकाणी राष्ट्रवादीला 7 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिल्याने आता विरोधात एकही पक्ष नाही. नागालँड राज्याच्या व्यापक हिताचा विचार करता त्याचसोबत राष्ट्रवादी आणि रिओ यांचे जुने संबंध पाहता या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिला आहे, असे प्रभारी नरेंद्र वर्मा म्हणाले.

दरम्यान, भाजपा- शरद पवार यांची जवळीक असल्याचे कायम चर्चा होत असते. शरद पवार यांचे भाजपच्या अनेक वरीष्ठ नेत्यांबर चांगले संबंध आहेत. आता नागालँडच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या राजकारणावर काय परिणाम होणार का हे लवकरच समजेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe