मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास २५ मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार यांच्या मोदी भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबत स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, बारा आमदारांचे नियुक्तीसंदर्भात आम्ही साहेबांना बोललो होतो, त्यानुसार त्यांनी ही भेट घेतली असावी, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
तसेच गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यात बारा आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडलेला आहे. राज्यपालांकडून (Governor) या बारा आमदारांच्या नियुक्तीला ब्रेक लागला आहे.
याबाबत आधीही अनेकदा चर्चा आणि भेटी झाल्या आहेत. मात्र अद्याप याबाबत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पवारांनी या आदारांच्या नियुक्तीबाबत थेट मोदींची भेट घेऊन चर्चा केली, असावी असे अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, शरद पवार किंवा भाजपकडून (Bjp) मात्र या भेटीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र अजित पवारांनी या भेटीबाबत महिती दिल्याने आता तरी बारा आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे का? आता तरी रखडलेल्या यादीला मंजुरी मिळणार का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.
तसेच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आणि शिवसेना (Shivsena) आणि भाजप यांची युती तुटल्यापासून केंद्र आणि राज्यात जणू पाचवीला पुजलेला संघर्ष निर्माण झाला आहे. मात्र पवार व मोदी यांच्या या भेटीनंतर या संघर्षाची धार बोथट होणार का? हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.