“शरद पवार भाजपला घाबरतात, …तर जिंकलोच असतो”

Published on -

पुणे : भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहलेल्या पत्रावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) भाजपला घाबरतात. एकट्याने लढण्याची त्यांची हिंमत नाही. एकत्र लढूनही त्यांची फ्या फ्या होते हे कोल्हापूरला दाखवलं.

ते एकत्र लढले तरीही त्यांना 96 हजार आणि आम्हाला 78 हजार मतं मिळाली. 9 हजार मतं अजून मिळाली असती तर जिंकलोच असतो असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज ठाकरेंचे (Raj Thackeray) पात्र वाचल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरेंनी जे पत्र लिहिलं ते पत्र मी वाचलं, समर्पक आहे. कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. मात्र, महाविकास आघाडीचं वागणं आणि व्यवहार तसात दिसतो.

याला उचल, त्याला पकड, खोट्या केसेस टाक आणि शेवटी महापालिका ताब्यात आहे म्हणून घराला नोटीस पाठव, असं सगळं चाललं आहे. मर्यादा नाही अशी दादागिरी सुरु आहे असा आरोपही पाटील यांनी केला आहे.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, राज ठाकरे हेच योग्य तो निर्णय घेतील. भाजप खासदारांचा तो वैयक्तिक अजेंडा आहे. राज ठाकरे यांनी बिहारी आणि उत्तर भारतीय लोकांबाबत त्या वेळी काय म्हटलं, त्यांच्याविषयी काय बोलायला हवं,

जे काही ते म्हणाले त्याबद्दल ते अलीकडच्या सभांमध्ये बोलत आहेत. पण त्याबाबतचा निर्णय ते स्वत:च घेतील. देवेंद्र फडणवीस या विषयात जे काही करायचं ते करतील असेही पाटील यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe