Share Market : अलीकडच्या काळात अनेकजण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत आहेत. काही गुंतवणूकदार असे आहेत ज्यांना कमी वेळेत जास्त परतावा पाहिजे असतो. परंतु प्रत्येक वेळेस शेअर मार्केटमधून उत्तम परतावा मिळतोच असे नाही.
खरतर शेअर मार्केटमधील गुंतवणूक खूप जोखमीची असते. यात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला शेअर मार्केटची संपूर्ण माहिती असावी लागते. दरम्यान, Vinyas Innovative Technologies IPO ने आपल्या गुंतवणूकदारांना खूप श्रीमंत केले आहे. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. या कंपनीचा IPO चा प्राइस बँड ₹162 ते ₹165 प्रति इक्विटी शेअर निश्चित केला आहे.
IPO ला मिळाला चांगला प्रतिसाद
आनंदाची बाब म्हणजे Vinyas IPO ची सबस्क्रिप्शन स्थिती चौथ्या दिवशी 43.24 पट इतकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ गुंतवणूकदारांकडून या IPO ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांचा हिस्सा 21.27 पटीने सेट करण्यात आला आहे.
तर त्याच वेळी, गैर-संस्थात्मक खरेदीदारांनी सेट करण्यात आलेले शेअर 95.16 पट आणि QIB चे बुकिंग 42.74 पट असे झाले होते. महत्त्वाचे म्हणजे ऑफरवर असणाऱ्या 22,03,200 शेअर्सच्या तुलनेत कंपनीला 9,52,62,400 शेअर्ससाठी बोली मिळाली होती. हे लक्षात घ्या की Vinyas IPO ची सदस्यता स्थिती पहिल्या दिवशी 23% होती तर ही स्थिती दुसऱ्या दिवशी 37% ऑफरची सदस्यता घेतली होती. तसेच Vinyas IPO ची सबस्क्रिप्शन स्थिती तिसऱ्या दिवशी 3.19 पट इतकी होती.
जाणून घ्या कंपनी बद्दल
हे लक्षात घ्या की ही 2001 सालची कंपनी आहे. Vinyas Innovative Technologies Ltd. जागतिक मूळ उपकरणे उत्पादक आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगातील मूळ डिझाइन, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेवा देते आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना बिल्ड टू प्रिंट (B2P) आणि बिल्ड टू स्पेसिफिकेशन (B2S) सेवा प्रदान करते.