Share Market : अलीकडच्या काळात शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. जर तुम्हाला शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला शेअर बाजाराची संपूर्ण माहिती असावी लागते. काही शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना जास्त परतावा देतात.
तर काही शेअर्समुळे गुंतवणूकदारांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. जर तुम्हाला शेअर बाजारातून चांगले पैसे कमवायचे असतील तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, तर तुम्ही चांगली कमाई करू शकता. कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घ्या.
सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी समजायला वेळ लागेल. इतकेच नाही तर नवीन गुंतवणूकदार आणि जुने गुंतवणूकदारांना किती वर्षे गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतो, याबाबत संभ्रम तयार होतो. जाणून घ्या सविस्तर माहिती.
शेअर मार्केट
समजा तुम्ही गुंतवणुकीच्या उद्देशाने शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला तर तुम्हाला खूप चांगला परतावा मिळू शकेल. ज्या लोकांनी शेअर मार्केटमधून पैसे कमावले आहेत त्यांच्याकडे निश्चितपणे दीर्घकालीन पोर्टफोलिओ असू शकतो. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनीही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करावी लागू शकते. हे लक्षात घ्या की अल्पावधीत उच्च परतावा मिळण्याबाबत साशंकता आहे.
तयार करा पोर्टफोलिओ
समजा तुम्ही 30 वर्षांपेक्षा कमी वयात दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला निश्चितपणे कमीत कमी १० वर्षांसाठी गुंतवणूक पोर्टफोलिओ बनवावा लागेल. कारण तरुण वयामुळे अनेकांना खूप संधी आहेत. अशा परिस्थितीत समजा तुम्ही कमीत कमी 10 वर्षांचा पोर्टफोलिओ बनवला आणि चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास तुमची संपत्तीत वाढ होऊ शकते.
कंपनीची वाढ पहा
ज्यावेळी लोक शेअर बाजारात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असतात त्यावेळी त्यांच्या मनात हा प्रश्न पडतो की दीर्घ मुदतीसाठी किती वर्षे गुंतवणूक करावी. त्यामुळे समजा एखाद्या चांगल्या कंपनीत पैसे गुंतवल्यास त्याची वाढ पाहणे खूप गरजेचे आहे. येत्या वर्षभरात कंपनी कशाप्रकारची कामगिरी करू शकते देखील त्यात पाहायला हवे.