अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- संसाराची गाडी धावण्यासाठी मने जुळणे गरजेचे असते. मात्र यामध्ये कटूपणा आल्यास अनर्थ होणारच हे नक्की… असाच काहीसा प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. होणार्या पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील तरूणावर राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी देवळाली प्रवरा येथील मयत मुलीची आई रोहिणी राजेंद्र देठे यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादित म्हटले, माझी मुलगी शितल राजेंद्र देठे हिचे गणेगाव येथील सुयोग सुभाष कोबरणे याच्याशी लग्न ठरले होते. साखरपुडा झाला होता. सुयोग व शितल हे लग्न ठरल्यापासून नेहमी फोनवर बोलायचे.
तसेच व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करायचे. एके दिवशी शीतलेचे होणार पती सुयोगशी फोनवर बोलणे झाले. व त्यानंतर ती नाराज दिसल्याने घरच्यांनी विचारले असता तिने सांगितले कि, सुयोगने माझ्याशी लग्नास नकार दिला असून तू दुसरा मुलगा पहा, मला तुझ्यासोबत लग्न करायचे नाही, असे तो म्हणाला.
त्यानंतर रात्री सुयोग कोबरणे यांचा माझे पती राजेंद्र यांना फोन आला, शितल ही माझा फोन उचलत नाही. तुम्ही घराबाहेर जाऊन पहा. असे सांगितले. बाहेर बघितले असता शितल हिने गायीच्या गोठ्यात लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेला दिसली.
तिला खासगी वाहनाने प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी ती उपचारपूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी मयत मुलीची आई रोहिणी देठे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात सुयोग कोबरणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम