शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हरवलेत…सापडून देणाऱ्यास बक्षीस मिळणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक हरवले असून यामुळे शेवगाव शहरातील नागरीसुविधेची कामे ठप्प झालेली आहेत.

यामुळे हे अधिकारी कार्यालयात सापडून देणा-यांस मनसेच्या वतीने १००० रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. शेवगाव नगरपरिषदेत सध्या मुदत संपल्यांने प्रशासक असुन त्यांचे देखील नगरपरिषदेच्या कामकाजाकडे लक्ष नाही.

मुख्याधिकारी गर्कळ यांची बदली झाल्यानंतर प्रभारी राज्य असल्याने प्रभारी मुख्याधिकारी देखील नगरपरिषदेत नसतात. नगरपरिषदेत कुठलाच जवाबदार अधिकारी हजर रहात नसल्याने नागरिकांनी समस्या कुणाकडे मांडायच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या नगरपरिषदेचा सर्व कारभार पाथर्डी येथूनच चालवला जात असून हे कार्यालयच जणू पाथर्डीला हलविले गेले कि काय ? अशी परिस्थिती आहे.

नगरपरिषदेच्या सर्व महत्वाच्या फाईली नगरपरिषद कार्यालयात नसून नगरपरिषदेने नेमलेल्या कन्सल्टंटच्या कार्यालयातूनच नगरपरिषदेचा कारभार सुरु आहे.

येत्या आठ दिवसात जर संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित राहीले नाही तर शेवगाव शहरात ठिकठिकाणी अधिकारी हरवल्याचे पोस्टर मनसेच्या वतीने लावण्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe