“स्वत:च्या खासदारांच्या तोंडाला शिवसेनेनं काळं फासलं”; नाणार प्रकल्पावरून नितेश राणेंचा शिवसेनेवर घणाघात

Published on -

सिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी (Refinery Project) प्रकल्पावरून राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर भाजपाही (BJP) चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) खोचक टीका केली आहे.

शिवसेना सत्तेत येण्याअगोदर नाणार रिफायनरी प्रकल्प उभारण्यास विरोध करत होती. मात्र आता शिवसेनेचा विरोध नसल्याचे दिसून येत आहे. प्रकल्पाची जागा बदलून दुसरी जागा निश्चित करण्यात आली आहे.

तसा प्रस्तावही राज्य सरकारकडे देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जानेवारीमध्येच पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे.

नितेश राणे म्हणाले, रिफायनरी प्रकल्प कोकणातच होणार हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय. नाणारमध्ये हा प्रकल्प होण्यास शिवसेनेच्या विरोधाला काही कारण असू शकतं.

राज्य सरकारच्या माध्यमातून आता बारसूचा प्लॅन आला आहे. मात्र, सगळे विषय केंद्र सरकारकडे जाणार आहेत. त्यामुळे केंद्राकडून यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. बारसूला शिवसेनेनं परवानगी का दिली हा संशोधनाचा विषय आहे.

टोकाचा विरोध असणाऱ्या शिवसेनेची भूमिका का बदलली? स्वत:च्या खासदारांच्या तोंडाला शिवसेनेनं काळं फासलं, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे.

नवीन प्रस्तावात शिवसेनेकडून गौडबंगाल असल्याचा आरोप करत आम्ही 7/12 तपासून पाहून लवकरच खुलासा करु. अभ्यास करून योग्यवेळी अजून एक पेनड्राईव्ह काढला जाईल, असं नितेश राणे म्हणाले. कधीच न आलेले पर्यटनमंत्री आज आले त्यामुळे पर्यावरण खराब होणारच असा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News