शिवसेना आता शरद पवारांची बी टीम, शरद पवारांचे चमचे… अनिल बोंडे यांची शिवसेनेवर घणाघाती टीका

Published on -

अमरावती : MIM ने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस ला (Congress) जेव्हापासून आघाडीत समावून घेण्याची ऑफर दिली आहे. तेव्हापासून शिवसेनेवर (Shiv Sena) हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीकेची झोड उठली आहे. आता भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘हिंदूहृदयसम्राट ऐवजी शिवसेनेनं जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलं अशी कडवी टीका त्यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कडाडून उत्तर दिले आहे. भाजपचा उल्लेख हिजबुल जनता पक्ष असा उल्लेख ठाकरे यांनी केला आहे.

अनिल बोंडे म्हणाले, हिंदू शिवसेनेची साथ सोडत आहेत म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. शिवसेना आता शरद पवारांची बी टीम म्हणून काम करतेय. आम्ही शरद पवारांचे चमचे आहोत, असं स्वत: शरद पवार म्हणतात.

गोवा, उत्तर प्रदेशात हिंदू समाजानं शिवसेनेला ‘नोटा’खाली झोपवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर बांधून बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करत आहेत.

बाळासाहेब सोनियांची लाचारी करणाऱ्याला XXX म्हणत होते आणि ती लाचारी आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर आणल्याचा दावा अनिल बोंडे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, हिंदुत्वावरुन शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न बोलावता पाकिस्तानात जाऊन केक खाऊन आले.

भाजपनं अफझल गुरूला फाशी नको म्हणणाऱ्या मेहबूबा मुफ्तींशी युती केली होती. या घटनांनंतरही तुम्ही आम्हाला जनाब सेना म्हणत असाल तर तुम्हाला पाकिस्तान जनता पक्ष किंवा हिजबुल जनता पक्ष म्हणायचे का? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी केला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News