नव्या सरकारविरोधात शिवसेनेची कोर्टात धाव

Published on -

Maharashtra news : नव्या सरकारविरोधात शिवसेनेतर्फ कोर्टात धाव घेण्यात आली आहे. बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवनेतर्फे सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली.

नव्या सरकारचा हा शपथविधी बेकायदेशीर आहे. त्यांना कुठल्या नियमांखाली सत्तास्थापनेचे निमंत्रण देण्यात आले, असा सवल करीत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये यासंबंधी चर्चा झाली. त्यानंतर याचिका दाखल करण्यात आली आहे. अधिवेशन उद्या आणि परवा होत आहे. त्यामुळे या याचिकेवर आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe