अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- शिवसेनेचा ५५वा वर्धापन दिन शहर आणि उपनगरात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त ठिकठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.सकाळपासून विविध शाखांमध्ये सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली होती. कुठे रक्तदान शिबीर, तर कुठे कोविड योद्ध्यांचा सन्मान,
नर्स व आशा सेविका यांना जीवनावश्यक वस्तूंमध्ये संपूर्ण किराणा किट व मिठाई वाटप, लाडू वाटप,प्रभागात जंतूनाशक औषधफवारणी आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
कोरोनाच्या नियमांचे पालन करून या सर्व कार्यक्रमांचे आयोजन नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख कलविंदर दडियाल,
महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे, युवती सेना अक्षिता आमले, ग्राहक संरक्षण कक्ष, सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम