अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- नगर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सेनेच्या नगरसेविका पुष्पा बोरुडे यांची, तर उपसभापतीपदी मीना चोपडा यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नगर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी एकही अर्ज दाखल झाला नाही.

त्यामुळे बिनविरोध हि निवड झाली आहे. दरम्यान याबाबतची अधिकृत घोषणा आज होणाऱ्या विशेष सभेत केली जाणार आहे. महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडीसाठी बुधवारी विशेष सभा होत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी दुपारी दीड वाजेपर्यंतची मुदत होती. दरम्यान सभापतीपदासाठी शिवसेनेच्या बोरुडे, तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या चोपडा यांचा सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यांच्याविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
त्यामुळे सभापती पदी बोरुडे यांची, तर उपसभापतीपदी चोपडा यांची बिनविरोध निवड झाली आहे. समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे काम पाहणार आहेत.
त्यांच्या उपस्थितीत बुधवारी महापालिकेत सभा होणार असून, या सभेत बोरुडे व चोपडा यांच्या नावाची घोषणा केली जाईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम