Hyundai Price Hike : ग्राहकांना धक्का! आता ह्युंदाईच्याही कार्स महागणार, कंपनीने केली घोषणा

Ahmednagarlive24 office
Published:

Hyundai Price Hike : ह्युंदाई ही दक्षिण कोरियन वाहन उत्पादक कंपनी आहे. परंतु, ह्युंदाईच्या सर्व कार्सना भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. अशातच आता ह्युंदाईच्या ग्राहकांना धक्का देणारी बातमी आहे.

अकारण कंपनी पुढच्या वर्षी म्हणजे 2023 साली त्यांच्या कार्सच्या किमतीत मोठी वाढ करणार आहे. त्यामुळे आता ह्युंदाईच्या कार्स खरेदी करताना ग्राहकांना जास्त पॆसे मोजावे लागणार आहेत.

वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरियंटच्या आधारे किंमत वाढणार असल्याचे कंपनीचे मत आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, वाढीव खर्चाचा सर्वाधिक खर्च कंपनी स्वतःच करत असून या खर्चात झपाट्याने वाढ झाल्यामुळे, कंपनीला वाहनांच्या किमतीत कमीत कमी वाढ करावी लागत आहे.

तसेच एचएमआयएल ग्राहकांवरील किंमतींचा प्रभाव कमी करण्यासाठी आपले अंतर्गत प्रयत्न सुरू ठेवेल. या मॉडेल श्रेणीसाठी नवीन किमती जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे.

 

कंपनीने मागच्या महिन्यात कारची 48,003 युनिट्सची देशांतर्गत विक्री झाली आहे.  या महिन्यात 16,001 युनिट्सची निर्यात झाली आहे. कोरियन वाहन निर्मात्यासाठी महिन्यासाठी एकत्रित विक्रीचा आकडा 64,004 युनिट्स इतका होता, जो 2021 मध्ये त्याच महिन्याच्या तुलनेत 36.4 टक्क्यांनी वाढला असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

कंपनीची सर्वात जास्त विक्री होणारी कार Creta ने मासिक तसेच वार्षिक विक्रीत वाढ नोंदवली असून त्याची सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हेन्यू सतत चांगली कामगिरी करत आहे. त्याशिवाय Hyundai Grand i10 Nios, i20, Aura, Alcazar, Verna आणि Tushaw सारख्या कारने गेल्या महिन्यात त्यांच्या वार्षिक विक्रीतही वाढ केली आहे.

देशात Hyundai Motor ग्लोबल फ्लॅगशिप इलेक्ट्रिक क्रॉसओवर Ioniq 5 लॉन्च करणार आहे. ही कार पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये सादर होण्याची शक्यता वर्तवली आहे. या कारचे बुकिंग 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

कोरियन कार निर्मात्याने अधिकृतपणे EV लाँच केल्याची पुष्टी अगोदरच केली आहे, भारतात त्यांचे नवीन EV प्लॅटफॉर्म सादर करणार असून त्याचे नाव E-GMP (इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म) आहे.

ही कार या प्लॅटफॉर्मवर बनवलेले Hyundai चे पहिले इलेक्ट्रिक वाहन आहे. हे अगोदरच जागतिक बाजारपेठेत सादर केले गेले असून तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर किआच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार EV6 सारखे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe