Mahindra Car Sales : महिंद्रा ही भारतीय बाजारातील दिग्ग्ज कार उत्पादक कंपनी आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या कार्सच्या किमतीत कमालीची वाढ केली होती. त्यामुळे ग्राहकांना आता कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे.
अशातच आता पुन्हा एकदा कंपनीकडून ग्राहकांना खूप मोठा धक्का देण्यात आला आहे. कारण कंपनीच्या काही 3 कार्सची विक्री थांबली आहे. त्यामुळे आता या कार कंपनीने कायमच्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीच्या या कार्स खूप लोकप्रिय होत्या. मात्र मागील काही महिन्यापासून त्यांची विक्री थांबली आहे.
संपूर्ण देशभरात एप्रिलपासून उत्सर्जनाचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. त्यामुळे आता प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व कार कंपन्यांनी या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तथापि, महिंद्राने या नवीन नियमांची पूर्तता करण्यासाठी आपले तीन मॉडेल्स अपडेट न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. परिणामी, कंपनी ३१ मार्चपर्यंत या गाड्यांचा स्टॉक क्लिअर करत असून अजूनही कंपनीने या निर्णयाबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.
विक्रीत घट
कंपनीची प्रभावित मॉडेलपैकी एक महिंद्रा मराझो असून तिच्या विक्रीत मागील काही महिन्यांत कमालीची घट झाली आहे. विक्रीबाबत सांगायचे झाले तर कंपनीने जानेवारी 2023 मध्ये, कारच्या फक्त 164 युनिट्सची विक्री केली होती, जी मागच्या वर्षी याच महिन्यात 956 युनिट्सची विक्री झाली होती.
कंपनीचे दुसरे मॉडेल म्हणजे महिंद्रा KUV100. मागच्या काही महिन्यांत, या कारच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, डिसेंबर 2022 मध्ये फक्त एक युनिट विकले गेले आणि त्यानंतरच्या महिन्यांत एकही युनिटची विक्री झाली नाही.
विक्रीत मोठी घट झाली असल्याने कंपनी डिसेंबर 2022 मध्ये आपले फ्लॅगशिप मॉडेल Mahindra Alturas बंद करणार आहे. कंपनीने वाहनाचे उत्पादन बंद करून नवीन बुकिंग स्वीकारणेही बंद केले होते. कंपनी आता कारचा उर्वरित स्टॉक क्लिअर असल्याची माहिती आहे.