अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ऊसाला मिळणाऱ्या एफआरपीसाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं. मात्र आता राजू शेट्टी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहे.
यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. थकित रक्कम मुदतीपेक्षा जादावेळ थकल्यास त्याला 15 टक्के जादा व्याजदर देण्याची तरतूद आहे.

ही व्याजाची रक्कम कोट्यवधी रूपये थकीत असताना स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकार्यांनी साखर कारखान्याला व्याज नको म्हणून करारपत्रे दिली आहेत.
त्यामुळे स्वाभिमानीने शेतकर्यावर बोलू नये, म्हणजेच राजू शेट्टी यांनी साखर कारखान्याबरोबर सेटलमेंट केली असल्याचा आरोप आंदोलन अंकुशचे धानाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत केला.
याआधी त्यांनी एका मुलाखतीत व्याजाची रक्कम घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असं म्हटलं होतं. मात्र आता राजू शेट्टी कारखानदारांना फितूर झाले आहेत, असंही चुडमुंगे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, असं बाहेरून म्हणायचं आणि आतून कारखानदारांना सामिल व्हायचं असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम