धक्कादायक : भर दुपारी घरात घुसून विवाहितेवर अत्याचार आरोपी जेरबंद; ‘या’ ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- दुपारच्या वेळी घरात काम करत असलेल्या एका विवाहितेवर घरात घुसून एकाने अत्याचार केला. तसेच तू माझ्या शिवाय इतर कोणाशी संबध ठेवले तर तुला जिवे ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. ही घटना पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे शुक्रवारी घडली आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादी नमूद केले आहे की, तिसगाव येथील तन्वीर पिंजारी हा त्याची मोटरसायकल घेऊन फिर्यादी यांच्या घरी आला.

फिर्यादीला म्हणाला की मी तुझ्यावर प्रेम करतो. फिर्यादीच्या हाताला धरून बळजबरीने ओढत घरात घेऊन गेला व फिर्यादीच्या अंगाशी अंगलट केली.फिर्यादीने आरडाओरडा केली मात्र पिंजारीने तोंड दाबले व जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला.त

सेच तू जर कोणाला काही सांगितले आणि माझ्या शिवाय इतर कोणा सोबत संबंध ठेवले तर तुला ठार मारून टाकीन अशी धमकी दिली.

याप्रकरणी पीडित महीलेने पोलिसात तक्रार दिली असुन त्यावरून पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तन्वीर पिंजारी (रा.मांडवा रोड तिसगाव) याला पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. पिंजारी हा तिसगाव येथे मटक्याचा अवैध धंदा करत आहे.