अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांमध्ये वाढ होत आहे, व रोगाचा धोका देखील आता हळुहली वाढू लागला आहे.
नुकतेच शिर्डीत अवघ्या ५ वर्षाच्या चिमुकलीला म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. लोणी येथील प्रवरा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील कोरके कुटुंब शिर्डीत रहिवासी आहे. त्यांना दोन मुली आहे.
लहानी मुलगी ५ वर्षाची आहे. तिची ताब्यात अस्वस्थ असल्याने तिला कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नाशिक येथे हलविण्यात आले. तिची कोरोना चाचणी केली ती निगेटिव्ह आली.
मात्र तरीही तिला फरक पडत नव्हता. नंतर तिचा चेहरा, डोळे आणि अंगावर सूज आल्याचे आढळून आले. ही म्युकरमायकोसिसची लक्षणे असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्यानुसार उपचार करण्याचा सल्ला दिला.
मुलीच्या वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला नाशिक येथून लोणी प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १३ जूनला दाखल करण्यात आले आहे. इतक्या कमी वयात हा आजार झाल्याने डॉक्टरांपुढे आव्हान उभे राहिले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम