धक्कादायक ! “कुटुंब सुखी ठेवायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव”

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- भोंदूबाबाने एका महिलेला तिचं कुटुंब सुखी ठेवायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, अशी मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील वाकड येथे समोर आला आहे.(crime news)

मूळचा बीडचा असलेला आरोपी भोंदूबाबानेहा धक्कादायक प्रकार केला आहे. विशेष म्हणजे या महिलेचा पती स्वतः बीडला जाऊन या भोंदूबाबाला भेटला आणि त्याने पत्नीला कंबरेपासून खाली अपंग करण्याची मागणी केली.

यानंतर आरोपीने पीडित महिलेला फोन करून ही विकृत मागणी केली. पोलिसांनी या भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत. विलास बापूराव पवार उर्फ महाराज (रा. पिंपळवंडी पाटोदा, बीड) असे या आरोपी भोंदू बाबाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिलेचे आणि पतीचे फारसे पटत नव्हते. याच भांडणाला कंटाळून पतीने थेट बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे जाऊन विलास पवार या भोंदू बाबाची भेट घेतली.

तिथं माझ्या पत्नीला कंबरेच्या खाली अपंग करून जादूटोणा करा अस सांगितलं. त्यानंतर, भोंदू बाबा विलासने स्वतः पीडित महिलेला फोन करून तुझा पती माझ्याकडे आला होता. त्याने तुला कंबरेपासून खाली अपंग करण्यास सांगितले आहे असे सांगितले.

भोंदू बाबा दररोज फोन करून महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. भोंदू बाबाने पीडित महिलेला भीती दाखवत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. कुटुंब सुखी ठेवायचे असेल तर माझ्याशी शरीर संबंध ठेव अशी मागणी भोंदू बाबाने केली.

या घटनेमुळे पीडित महिला घाबरली. अखेर महिलेने वाकड पोलिसांकडे धाव घेतली आणि सर्व हकीकत सांगितली. त्यानुसार, भोंदू बाबा विलासवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe