अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- प्रशासनाच्या नावावर टिच्चून अवघ्या बारा वर्षाची मुलगी आणि चौदा वर्षाच्या मुलाचे लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे.,
एव्हढेच नव्हे तर या बदल्यात तब्बल एक ते दीड लाख मिळवण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील या अल्पवयीन मुलीचा विवाह काही दिवसां पूर्वीच श्रीगोंदयात होणार होता,
मात्र मुलीच्या आईने याबाबत दिलेल्या तक्रारीने तो शक्य झाला नाही. मात्र त्यानंतर सदर अल्पवयीन मुलगी-मुलगा यांचा विवाह श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगावात पार पडला.
याबाबत अहमदनगरच्या चाईल्ड लाईन संस्थेने पाठपुरावा सुरू केला असून, संबंधितांना बाल कल्याण समिती समोर संबंधित दोन्ही पार्टी, ग्रामसेवक यांना बोलावले आहे. तर याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम